Welcome Entertainment Lover’s

Shona Lyrics | Boyz 2

                        
                        नकळत हे झाले असे अन्
मन जुळले माझे तुझे
दरवळतो प्रेमाचा मौसम
जग अवघे माझे तुझे
अनोळखी वाटेवरी
भान हरवले जरी
शहारल्या क्षणातही
तोल सावरताना
ये ना.. शोना ये ना
अबोल स्वप्नांचे
तरंग उठताना
ये बोलुया… डोळ्यातुनी
तुझ्या इशाऱ्याने
उनाड वारा ही
खुणावतो… भासांतुनी
जिथे जिथे … फिरे नजर
तुझा असर…तुझा बहर
ये ना.. शोना ये ना
मनातले सारे
ओठांवरी आले
हुरहूर ही लागे नवी
सुगंध श्वासांचा
श्वासांत भरताना
मिठी जणू उमलावी
तुझ्यात मी.. माझ्यात तू
पुकारतो नवा ऋतू
ये ना.. शोना ये ना.