कळंना काही.. ह्यो कशापाई
करपला जल्म सारा
वावटळ ही जिंदगीची
कुठं दिसंना निवारा
कळंना काही.. ह्यो कशापाई
करपला जल्म सारा
वावटळ जिंदगीची
कुठं दिसंना निवारा
फाटलेल्या नशिबाला
किती लावू ठिगळं
आटलेल्या ईहिरीच्या
डोळ्यांमंधी आभाळ
कल्लोळ.. कल्लोळ
उरात.. कल्लोळ
उरात.. कल्लोळ
हारवून गेलं, सुखाचं सपान
पुनवंचं चांदणं पेटलं
बदललं सारं, जगाचं वागणं
नात्यात बी कुंपन घातलं
मायेच्या ह्या पदरात
बोचतिया बाभळ
आटलेल्या ईहिरीच्या
डोळ्यांमंधी आभाळ
कल्लोळ.. कल्लोळ
उरात.. कल्लोळ
उरात.. कल्लोळ
उधळला डाव, पलटलं दानं
क्षणात वैराण झाला पटं
भेगाळली वाट,ठेचाळलं मनं
वळखिची खूणं नाही कुठं
हरलेली रात शोधे
अंधारात सकाळ
आटलेल्या ईहिरीच्या
डोळ्यांमंधी आभाळ
कल्लोळ.. कल्लोळ
उरात.. कल्लोळ
उरात.. कल्लोळ तू ,टांगू नको.