Welcome Entertainment Lover’s

Tula Pahata Lyrics | Mumbai Pune Mumbai 3

                        
                        तुला पाहता आजही , 
हासते या मनी चांदणे
बहरुन प्रीत ये अशी
गाली पडे खळी जशी 
साथ तुझी मला हवी जीवनी

ओंजळीतूनी भरूनी जो आणतो, सुख नवे,
पाऊस तो पहिला,
ओळखीतल्या वाटती बरसत्या सरी नव्या,
स्पर्श तुझा होता,
जरा जरा लाजरे,
तुझ्या सवे साजरे,
ॠतूंचे खरे सोहळे,
ॠतूंचे खरे सोहळे,
बहरून प्रीत ये अशी,
गाली पडे खळी जशी,
साथ तुझी मला हवी जीवनी…

सावली तुझी भासते मी जिथे तू तिथे,
बंध हे जन्मांचे,
पापणीवरी गुंफते माळते रात ही,
रंग हे स्वप्नांचे
हळू हळू जोडले,
हळू हळू जोडले
मनाने मनाशी दुवे,
बहरून प्रीत ये अशी,
गाली पडे खळी जशी,
साथ तुझी मला हवी जीवनी…